KGF Chapter 2 (PC - Twitter)

KGF 3 Update: सुपरस्टार यशचा चित्रपट KGF Chapter 2 ने जगभरात एक हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हिंदी भाषेत या चित्रपटाने 400 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटामुळे अनेक मोठे बॉलिवूड चित्रपटही बॉक्स ऑफिसवर मागे पडले. चित्रपटाचे दोन चॅप्टर लोकांना खूप आवडले आहेत. अशातचं तिसऱ्या चॅप्टरची चर्चा रंगताना दिसत आहे.

अलीकडील मीडिया रिपोर्ट्समध्ये, KGF निर्माते विजय किरागंदूर यांनी दावा केला होता की, 'KGF 3' या ऑक्टोबरमध्ये फ्लोरवर जाईल. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज करण्याची योजना आहे. मात्र, आता हे वृत्त होमबेल फिल्म्सने फेटाळून लावले आहे. होमबेल फिल्म्सचे कार्यकारी निर्माते कार्तिक गौडा यांनी सर्व अंदाज खोडून काढले आहेत आणि अधिकृत घोषणेसह चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - Rakhi Sawant ला मिळाला नवा बॉयफ्रेंड; अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडिओ, म्हणाली, BF ने गिफ्ट केली कार)

कार्तिक गौडा यांनी शनिवारी ट्विट केले, "ज्या बातम्या येत आहेत त्या सर्व कल्पना आहेत. आमच्या पुढे अनेक रोमांचक प्रकल्प असताना, आम्ही होम बेल फिल्म्स अद्याप KGF 3 सुरू करणार नाही. आम्ही त्यावर काम सुरू केल्यावर आम्ही तुम्हाला कळवू." कार्तिकच्या या ट्विटवरून हे स्पष्ट झाले आहे की, KGF च्या चाहत्यांना या चित्रपटाच्या तिसऱ्या अध्यायासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, 'KGF 2' गेल्या महिन्याच्या 14 तारखेला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हिंदी भाषेत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत पूर्वीचे अनेक विक्रम मोडले. हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. रवीना टंडन आणि संजय दत्त सारखे दिग्गज कलाकार देखील KGF Chapter 2 मध्ये दिसले. लोकांनी संजय दत्तच्या व्यक्तिरेखेचे ​​कौतुकही केले आहे.