Rakhi Sawant ला मिळाला नवा बॉयफ्रेंड; अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडिओ, म्हणाली, BF ने गिफ्ट केली कार
'बिग बॉस 15' संपल्यानंतर काही दिवसांनी दोघांनीही आपलं लग्न संपवण्याची घोषणा केली. आता अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली आहे. कारण तिच्या आयुष्यात एका नवीन मुलाने प्रवेश केला आहे.
फिल्म इंडस्ट्रीची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या नवीन बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक होत आहे. राखी सावंतने 'बिग बॉस 15' मध्ये दीर्घ काळानंतर तिचा एक्स पती रितेशची ओळख करून दिली. यादरम्यान अनेकांनी तो तिचा 'भाड्याचा' नवरा असल्याचे सांगितले. मात्र राखीने या बातम्यांचे खंडन केले. परंतु, 'बिग बॉस 15' संपल्यानंतर काही दिवसांनी दोघांनीही आपलं लग्न संपवण्याची घोषणा केली. आता अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली आहे. कारण तिच्या आयुष्यात एका नवीन मुलाने प्रवेश केला आहे.
वास्तविक, 14 मे 2022 रोजी राखीने तिच्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती तिच्या नवीन बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक अंदाजात दिसली होती. हा व्हिडिओ तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोंचा कोलाज आहे. व्हिडिओमध्ये राखी कधी त्याला मिठी मारताना तर कधी किस करताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, राखीने अद्याप तिच्या नवीन प्रियकराचे नाव आणि त्याच्याबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. (हेही वाचा - Pallavi Dey Dies by Suicide: बंगाली अभिनेत्री पल्लवी डे चा मृत्यू; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह)
यापूर्वी राखीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिच्यासोबत एक मिस्ट्री बॉय दिसत होता. पापाराझींशी बोलताना राखीने तो मिस्ट्री बॉय तिचा प्रियकर असल्याचे सांगितले होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पापाराझींनी राखीला विचारले होते, नवीन काय दिसणार? यावर अभिनेत्री म्हणाली होती की, 'बऱ्याच गोष्टी आहेत. अवॉर्ड नाईट, वेब सीरीज, चित्रपट.” पुढे, तिच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना राखीने सांगितले की, ते खूप दिवसांनी भेटले आहेत. यासोबतच तिने 'बिग बॉस'च्या पुढच्या सीझनमध्ये तिच्या प्रियकरासोबत जाण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
व्हिडिओमध्ये राखीच्या बॉयफ्रेंडने तिचे कौतुक केले आहे. राखी ही जमिनीशी जोडलेली व्यक्ती आहे, असे हा व्यक्ती म्हणत आहे. यासोबतच राखीने सांगितले होते की, तिच्या प्रियकराने तिला एक नवीन कारही गिफ्ट केली आहे. कारण, त्याचा कारचा मोठा व्यवसाय आहे.
View this post on Instagram
राखीच्या या व्हिडिओवर सिलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं आहे. त्याच वेळी, यूजर्स पुन्हा एकदा त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे कोण आहे? असा प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने तर असंही लिहिलं की, 'पहिल्यांदाच तुम्हाला चांगला बॉयफ्रेंड मिळाला आहे, तो जाऊ देऊ नका.'
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

