Manoj Desai On Adipurush: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेटी गॅलेक्सी (Gaiety Galaxy) आणि मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई (Manoj Desai) यांनी चित्रपटाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आदिपुरुषच्या निर्मात्यांना फटकारले आहे. मनोज देसाई यांनी चित्रपटातील डायलॉगवर आणि खराब VFX वर टीका केली गेली आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटातील विविध व्यक्तिरेखा साकारण्यावरही आक्षेप घेतले आहेत.
द फ्री प्रेस जर्नलला मुलाखत देताना मनोज देसाई यांनी म्हटलं आहे की, चित्रपटामुळे त्यांचे नुकसान होत आहे कारण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप कमी लोक येत आहेत. विशेषत: Gaiety Galaxy मध्ये आम्ही बरेच शो चालवत नाही. कारण, कोणीही चित्रपट पाहण्यासाठी येत नाही. प्रत्येक शो हॉलमध्ये फक्त 20 ते 30 लोक असतात. परिस्थिती खूपच वाईट आहे.
'जलेगी तेरे बाप की' सारखे संवाद सुधारण्याच्या निर्मात्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले की, नुकसान आधीच झाले आहे. मी चित्रपट पाहिला नाही पण आता संवाद बदलण्यात काय अर्थ आहे? आता काहीही फरक पडत नाही.
आदिपुरुषने जागतिक स्तरावर 400 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. परंतु, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस नंबरमध्ये घसरण सुरूच आहे. 16 जून रोजी हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि तमिळमध्ये देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रभास राघव (राम), जानकी (सीता) च्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लंकेश (रावण) च्या भूमिकेत सैफ अली खान आहे.
सुरुवातीच्या वीकेंडला, 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने केवळ तीन दिवसांत 340 कोटी रुपयांची कमाई केली. परंतु, सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रियानंतर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस स्कोअरमध्ये तीव्र घसरण झाली.