Bell Bottom Starcast Photo: खिलाडी अक्षय कुमार ने आपल्या आगामी 'बेल बॉटम' चित्रपटाच्या स्टारकास्टसह शेअर केला फोटो; पुढील महिन्यापासून शूटिंगला होणार सुरुवात
Bell Bottom Star Cast (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चा आगामी चित्रपट 'बेल बॉटम' (Bell Bottom) हा चित्रिकरणाआधीच बराच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे हॅशटॅग आज ट्विटरवर ट्रेंड देखील होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अक्षय कुमार ने सोशल मिडियावर आपल्या या चित्रपटातील स्टारकास्टसह फोटो शेअर केला आहे. पुढील महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट 2 एप्रिल 2020 ला प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाला घेऊन चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

बेल बॉटम हा चित्रपट रंजित तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. काही दिवसांपूर्वी वाणी कपूरने (Vaani Kapoor) आपण अक्षय कुमारसह काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज अक्षयने हा चित्रपटाच्या स्टारकास्टसह फोटो शेअर केला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबत 'बेलबॉटम' चित्रपटात झळकणार वाणी कपूर; अभिनेत्रीने सोशल मिडियावरुन व्यक्त केला आनंद

पाहा पोस्ट:

या फोटोत लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी, प्रोड्यूसर जैकी भगनानी आणि दिग्दर्शक रंजित तिवारी दिसत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून या चित्रपटाची शूटिंग सुरु होईल. कोरोना व्हायरस महामारी मध्ये हा पहिला भारतीय चित्रपट असेल जो विदेशात जाऊन शूट करेल. याचे चित्रिकरण युनायटेड किंग्डमला होणार आहे.