Into The Wild With Bear Grylls Teaser: बिअर ग्रील्स, अक्षय कुमारचा सहभाग असलेल्या 'इंटू द वाईल्ड विद बिअर ग्रील्स’ कार्यक्रमाचा टिझर प्रदर्शित
Akshay Kumar's Into The Wild With Bear Grylls episode Teaser (Photo Credits: Twitter)

Into The Wild With Bear Grylls Teaser: बिअर ग्रील्स (Bear Grylls) चा शो Into The Wild With Bear Grylls मध्ये खतरोंके के खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या कार्यक्रमाचा टिझर शेअर केला आहे. या टिझरला अक्षयच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बिअर ग्रील्ससोबत जंगलात फिरताना दिसत आहे. या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून येताना दिसत आहे. यात बिअर ग्रील्स आणि अक्षय कुमार पाण्यात पोहताना, रस्सीवर लटकताना तसेच प्राण्यांचा सामना करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार Elephant Poop Tea म्हणजे हत्तीच्या मलापासून तयार केलेला चहा पिताना दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये बिअर ग्रील्स चहाचा कप अक्षय कुमारला न दाखवता फेकून देताना दिसत आहे. (हेही वाचा - Ganesh Visarjan 2020: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितली गणपती बाप्पाच्या आवडीचे 'उकडीचे मोदक' बनवण्याची रेसिपी; Watch Video)

अक्षय कुमारशिवाय या कार्यक्रमाचा टिझर डिस्कव्हरी चॅनलनेदेखील शेअर केला आहे. 'आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो की #IntoTheWildWithBearGrylls हा भाग खूपचं मजेशीर होणार आहे,' असं कॅप्शन डिस्कव्हरी चॅनलने दिलं आहे. या महिन्यात 11 तारखेला हा भाग प्रदर्शित होणार आहे.