Meri Jaan Song Out: 'बच्चन पांडे' चित्रपटातील 'मेरी जान' गाणं प्रदर्शित; पहा Akshay Kumar आणि Kriti Sanon ची केमिस्ट्री, Watch Video
Bachchan Pandey song Meri Jaan (PC - Instagram)

Meri Jaan Song Out: अक्षय कुमारचा बच्चन पांडे (Bachchan Pandey) हा चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटातील 'मेरी जान' (Meri Jaan Song) हे नवीन गाणे रिलीज केले आहे. या गाण्यात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) ची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. हे गाणे गायक बी प्राक यांनी गायले आहे. बी प्राक यांनी यापूर्वीही अक्षय कुमारसाठी अनेक हिट गाणी गायली आहेत.

'मेरी जान' हे गाणे सुंदर लोकेशन्सवर शूट करण्यात आले आहे. गाण्याचे बोल जानी यांनी लिहिले असून बी प्राक यांनी त्यास संगीत दिले आहे. याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. आपल्या इंस्टाग्राम पेजवर हे गाणे शेअर करताना अक्षय कुमारने लिहिलं आहे, 'ज्याच्या हाकेवर बच्चन जातो, ज्यासाठी बच्चन मरायला तयार होतो. असे अप्रतिम प्रेम पहा.' (वाचा - Mouni Roy ने पिवळ्या रंगाच्या साडीत केले हॉट फोटोशूट; साडीची किंमत ऐकूण तुम्हीही व्हाल अवाक, See Photos)

अक्षय, क्रिती व्यतिरिक्त या चित्रपटात अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत. बच्चन पांडे आधी 4 मार्चला रिलीज होणार होता. परंतु, नंतर निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट वाढवली आणि आता तो होळीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 18 मार्चला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, बच्चन पांडे हा 2014 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट वीरमचा रिमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच क्रिती सेनन यात पत्रकाराची भूमिका बजावणार आहे.