Baaghi 3 Box Office Collection: टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या 'बागी 3' सिनेमाची दमदार कमाई; पहिल्याच विकेंडला 50 कोटींचा गल्ला
Baaghi 3 (Photo Credits: Youtube)

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा बागी 3 (Baaghi 3) सिनेमा 6 मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर 'बागी 3' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. टायगर-श्रद्धा यांच्या या अॅक्शन सिनेमाने पहिल्या दिवशी 17.50 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 16.03 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाने चांगलीच कमाई केली. कोरोना व्हायरसची दहशत सध्या सर्वत्र आहे. तरी देखील रविवारी बागी 3 पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली. यामुळे तिसऱ्या दिवशी सिनेमाने तब्बल 20.30 कोटींचा गल्ला केला. सिनेमाने 3 दिवसात एकूण 53.83 कोटींची कमाई केली आहे. (Do You Love Me Song in Baaghi 3: दिशा पटानी च्या मादक अदा आणि हॉटनेसचा तडका घेऊन आलंय बागी 3 चित्रपटातील 'डू यु लव्ह मी' गाणे, Watch Video)

ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांनी सिनेमाची कमाई ट्विटच्या माध्यमातून शेअर केली आहे. तरण आदर्श यांच्यानुसार, सिनेमाला मिळालेला संमिश्र रिव्हयू, कोरोना व्हायरसची दहशत आणि परिक्षेचा काळ तरी देखील बागी 3 सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. सिनेमाला मेट्रो आणि सिंगल स्क्रीन दोन्ही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सिनेमाने तिसऱ्या दिवशी 20 कोटींहून अधिक कमाई केली. भारतात सिनेमा एकूण 54 कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.

तरण आदर्श ट्विट:

'बागी 3' हा सिनेमा जगातील एकूण 5500 स्क्रीन्स तर भारतात एकूण 4400 स्क्रीनवर वर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती केली आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाचा पहिला विकेंड दमदार असला तरी पुढे सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकूण किती गल्ला करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.