Do You Love Me Song in Baaghi 3: दिशा पटानी च्या मादक अदा आणि हॉटनेसचा तडका घेऊन आलंय बागी 3 चित्रपटातील 'डू यु लव्ह मी' गाणे, Watch Video
Baaghi 3 Song (Photo Credits: YouTube)

जबरदस्त स्टंट्स आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) चे दमदार अॅक्शनसीन्समुळे बागी चित्रपटाच्या पहिल्या 2 भागांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचाच आता तिसरा भाग 'बागी 3' (Baaghi 3) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यात या दोघांचे जबरदस्त अॅक्शनसीन्स पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अलीकडेच या चित्रपटातील दस बहाने गाणे प्रदर्शित झाले. त्याच्या पाठोपाठ या चित्रपटातील 'डू यु लव्ह मी' (Do You Love Me) हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अभिनेत्री दिशा पटानीच्या (Disha Patani) हॉट अदा तुम्हाला पाहायला मिळतील.

हे गाणे निखिता हिने गायिले असून रेने बिंदाली ही संगीतकार आहे. अहमद खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून साजिद नाडियादवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. Dus Bahane 2.0 Song: श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्या हटके स्वॅगमधील Baaghi 3 मधील 'दस बहाने' रिमेक गाणे प्रदर्शित; Watch Video

पाहा 'Do You Love Me' गाणे:

टायगर आणि श्रद्धा सह रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे हे देखील प्रमुख भूमिकेत दिसतील. अंकिता लोखंडे ही श्रद्धा कपूर हिच्या मैत्रिणीची भुमिका साकारणार आहे. अहमद खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 6 मार्चला प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'बागी 3' व्यतिरिक्त रितेश 'हाउसफुल 4' मध्ये दिसेल. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा सोबत 'मरजावां' चित्रपटातही तो काम करणार आहे. हा चित्रपट 5 मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होईल. रितेश आणि निर्माता साजिद नाडियाडवाला एकत्रित काम केलेला 6 वा चित्रपट आहे.