Sushant Singh Rajput Cases: सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग झाल्याने त्याचे शवविच्छेदन जाणीवपूर्वक उशिरा करण्यात आले -  सुब्रमण्यम स्वामी
Subramanian Swamy, Sushant Singh Rajput (PC - PTI, Twitter)

Sushant Singh Rajput Cases: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दररोज नव-नवीन खुलासे होत आहे. मुंबईमध्ये सीबीआय पथकाने या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग झाल्याने त्याचे शवविच्छेदन जाणीवपूर्वक उशिरा करण्यात आले, असा गंभीर आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केला आहे.

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे की, आता मारेकऱ्यांची राक्षसी मानसिकता आणि त्यांची मजल कुठवर गेली, हे हळूहळू उघडकीस येत आहे. सुशांतचे शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केले गेले. ज्यामुळे सुशांतच्या शरीरातील विष पोटातील पाचक द्रवपदार्थात मिसळतील आणि ते ओळखणं कठीण होईल. या प्रकरणात जे जबाबदार आहेत त्यांना पकडण्याची वेळ आली आहे, असंदेखील सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: Rhea Chakraborty सह तिच्या परिवाराला अद्याप CBI चा समन्स मिळालेला नाही - रियाचे वकील सतिश मानेशिंदे यांचे स्पष्टीकरण)

यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे, असा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून अनेक आरोप केले होते. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, यासाठी ते आग्रही होते.

या प्रकरणासंदर्भात केलेल्या एका ट्वीटमध्ये स्वामी यांनी म्हटलं होत की, 'सुनंदा पुष्कर प्रकरणात सगळ्या महत्त्वाची गोष्ट कोणती होती?, त्यांचं शवविच्छेदन करत असताना एम्सच्या डॉक्टरांना त्यांच्या पोटात कोणती गोष्ट आढळून आली होती? परंतु, श्रीदेवी आणि सुशांत यांच्या प्रकरणात असं काहीचं झालं नाही. मात्र, सुशांत प्रकरणात दुबईतील ड्रग्स डिलर अयाश खान सुशांतच्या मृत्यूच्याचं दिवशी त्याला भेटला होता. का?”, असा प्रश्न सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.