झाले. आशा 86 वर्षांच्या होत्या. त्यांनी शेवटचे काम ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या सिनेमात केले होते. आशा यांनी 'कुमकुम भाग्य'सारख्या लोकप्रिय मालिकेमध्येही काम केले होते. टीव्हीमध्ये त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवलेली. अभिनेत्री टीना घई यांनी त्यांच्या या निधनाबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या एप्रिलपासून त्या अंथरुणाला खिळूनच होत्या. 'आदिपुरुष'चे दिग्दर्शक ओम राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'खूप दुर्दैवी घडले. त्या एक विलक्षण अभिनेत्री आणि व्यक्ती होत्या. हे ऐकून खूप वाईट वाटले.' (हेही वाचा - Nari Hira Passes Away: प्रिंट मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार आणि स्टारडस्ट मासिकाचे संस्थापक नरी हिरा यांचे निधन)
पाहा पोस्ट -
#cintaa expresses its condolences on the demise of Asha Sharma #condolence #restinpeace @poonamdhillon @dparasherdp @itsupasanasingh @HemantPandeyJi_ @ImPuneetIssar @rishimukesh @bolbedibol @iyashpalsharma @SahilaChaddha @actormanojjoshi @RealVinduSingh @HetalPa45080733 @ljsdc pic.twitter.com/RihVuk7I5g
— CINTAA_Official (@CintaaOfficial) August 25, 2024
आशा शर्मा यांनी वयाच्या 13 व्या वर्षी व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी '1920', 'हमको तुमसे प्यार है', 'हम तुम्हारे हैं सनम' आणि 'मुझे कुछ कहना है' यासह 35 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी 'मन की आवाज प्रतिज्ञा', 'कुमकुम भाग्य' आणि 'मीत मिला दे रब्बा' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.