Asha Bhosle Account Hacked (Photo Credits: Twitter/Wikimedia Commons)

Asha Bhosle Instagram Account Hacked: गेली कित्येक दशके आपल्या गोड आवाजातील सदाबहार गाण्यांनी श्रोत्यांचे मनोरंजन करणा-या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक (Instagram Account Hacked) झाले आहे. आशा भोसले यांनी स्वत: ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले असून आम्ही लवकरच माझे खाते पुन्हा माझ्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती आशा भोसले यांनी दिली आहे. अनेक सेलिब्रिटीजप्रमाणे आता आशा भोसले या ज्येष्ठ गायिकेचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आशा भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे."कृपया याची जाणीव ठेवा की माझे इंस्टाग्राम खाते हॅक केले गेले आहे आणि आपल्याला खाली पोस्ट केल्याप्रमाणे संदेश प्राप्त होऊ शकेल. कृपया त्याकडे दुर्लक्ष करा आणि काहीही करू नका. आम्ही लवकरच माझे खाते पुन्हा माझ्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहोत" अशी पोस्ट त्यांनी केली आहे.हेदेखील वाचा- Urmila Matondkar चं Instagram Account रिस्टोर; मुंबई पोलिसांचे मानले आभार (See Post)

काही दिवसांपूर्वी अभिनेता स्वप्नील जोशी तसेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे देखील अकाउंट हॅक झाले होते. थोडक्यात इन्स्टाग्राम अकाउंट हॅक होणे हा देखील सायबर क्राईम असून हे कोणी व कसे केले याचा पोलिस शोध घेत आहे. दरम्यान आपल्या अकाउंट काही संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे अशी विनंती आशा भोसले यांनी त्यांच्या फॉलोअर्सला केली आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले. दरम्यान मुंबई पोलिसांच्या मदतीने तिचे अकाउंट पुन्हा रिस्टोर झाले. यासाठी तिने इंस्टा पोस्ट करत मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) आभार मानले होते. मात्र तिच्या काही पोस्ट मिस झाल्याचेही तिने म्हटले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अकाउंट असलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.