मुलीच्या जन्मानंतर Anushka Sharma-Virat Kohli पहिल्यांदाच मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद (See Pics)
Virat Kohli & Anushka Sharma (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यानंतर कडक सुरक्षेत असलेली अनुष्का आणि तिच्या चिमुकल्या सुरक्षेसाठी विराट कोहलीने सुरक्षा वाढवली असल्याची चर्चा रंगत होती. दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराट आणि अनुष्का मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आपल्या चिमुकलीला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी बाहेर पडलेले विरुष्का कॅमेऱ्यातून सुटले नाहीत. यावेळेस विरुष्काने देखील आनंदाने फोटोसाठी पोज दिल्या.

11 जानेवारी रोजी विरुष्काला कन्यारत्नाचा लाभ झाला. मात्र अद्याप विराट आणि अनुष्काने चिमुकलीची झलक दाखवलेली नाही. दरम्यान, या फोटोजमध्ये अनुष्का शर्मा पूर्वीप्रमाणेच फिट दिसत आहे. डेनिम लूकमध्ये ती जबरदस्त दिसत आहे. तर विराट कोहली ब्लॅक गेटअपमध्ये दिसत आहे. मुलीला घेऊन क्लिनिकमध्ये गेलेल्या अनुष्का आणि विराटने मीडियाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी कॅमेऱ्यासमोर हसतमुखाने पोजेज दिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क त्यांचा आनंद लवपू शकला नाही. (Virushka Baby: 'भविष्याची महिला टीम इंडिया तयार होत आहे...' अमिताभ बच्चन यांनी हटके अंदाजात केलं विराट-अनुष्काच्या चिमुरडीचं स्वागत, पहा Tweet)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

मुलगी झाल्याची गुड न्यूज विराट कोहलीने सोशल मीडियावर शेअर करत दिली होती. त्यात त्याने लिहिले होते की, आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभारी आहे. तसंच त्याने पुढे लिहिले होते की, बाळ आणि अनुष्का एकदम ठीक आहेत. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा चॅप्टर सुरु करत आहोत. परंतु, या काळात तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. विराट कोहलीच्या या पोस्टनंतर त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.