मुलीच्या जन्मानंतर दोनच महिन्यात Anushka Sharma ने सुरु केले काम; फिटनेस पाहून बसेल आश्चर्याचा धक्का (See Photo)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यावर्षी 11 जानेवारीला मुलगी वामिकाचे पालक झाले. यानंतर, अनुष्का आपल्या मुलीचा सांभाळ करण्यात पूर्ण वेळ देत होती. मात्र आता असे दिसत आहे की, घर आणि मुलगी सांभाळण्याव्यतिरिक्त अनुष्का आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्याही पूर्ण करत आहे. अनुष्का शर्माने मुलीच्या जन्मानंतर आता पुन्हा कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. सांगितले जात आहे की, अनुष्का शर्माने आपल्या शेड्युलच्या 2 महिन्याआधीच कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ती मेपासून कामावर परतणार आहे अशी माहिती होती.

अलीकडेच अनुष्का एका जाहिरातीचे शूट करताना दिसली आहे. आता असा विश्वास आहे की अनुष्का जाहिरातींसोबतच लवकरच चित्रपटांचे शुटिंग सुरू करू शकते. सध्या अनुष्काचे कामावर परत आल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये ती निळ्या रंगाची ढगळी डेनिम जीन्स आणि पांढरा टॉप परिधान केलेली दिसत आहे. कोविडच्या संरक्षणासाठी तिने स्वतःच्या चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाचा मास्क घातला आहे. मात्र या फोटोमधील एक गोष्ट सर्वांच्या नजरा वेधून घेत आहे ती म्हणजे अनुष्काचा फिटनेस. मुलीच्या जन्मानंतर दोनच महिन्यात कामावर परतणारी अनुष्का अगदी तिच्या पूर्वीच्याच शेपमध्ये आहे. (हेही वाचा: Yuzvendra Chahal ची बायको Dhanashree Verma चा Shikhar Dhawan सोबत गब्बर स्टाईल भांगडा; पहा धमाकेदार Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sharma (@anushkasharma5021)

एक वक्तशीर अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्माची इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. ती नेहमी वेळेआधीच शुटिंगला पोहोचते. सध्या ती आईच्या जबाबदाऱ्या सांभाळत पुढील 2 दिवस जाहिरातीचे शूट करणार आहे. दरम्यान, अनुष्का पुन्हा काम सुरु करत आहे ही चांगलीच गोष्ट आहे, मात्र दुसरीकडे ती ट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे. आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला सोडून ती कामावर रुजू झाल्याने अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. यासह तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिमी गरेवालच्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले आहे की, मुलाच्या जन्मानंतर मला काम करायला आवडणार नाही.