Anti Hijab Protest: इराणी महिलांच्या समर्थनार्थ पुढे आली Urvashi Rautela; हिजाबच्या निषेधार्थ कापले केस (See Photos)
Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

इराणमध्ये (Iran) अनेक दिवसांपासून हिजाबच्या विरोधात निदर्शने (Anti Hijab Protest) सुरू आहेत. एकीकडे सर्वसामान्य लोक सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचाराविरोधात व्हिडीओ शेअर करून आवाज उठवत आहेत. दुसरीकडे, बॉलिवूड सेलिब्रिटी इराणी महिलांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. याआधी प्रियांका चोप्राने या आंदोलनाला पाठींबा दिला होता, आता बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला इराणी महिलांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. इराणमध्ये पोलीस कस्टडीत झालेल्या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ उर्वशीने आपले केसही कापले आहेत.

स्वतः उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये दिसत आहे की, उर्वशी जमिनीवर बसलेली आहे आणि तिच्या बाजूला बसलेला एक माणूस तिचे केस कापत आहे.

फोटो शेअर करत उर्वशीने लिहिले की, 'मी माझे केस कापत आहे. नीट हिजाब न घातल्याने इराण पोलिसांनी महसा अमिनीला अटक केली. पोलीस कोठडीत या मुलीचा मृत्यू झाल्यापासून इराणी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या काळात अनेक इराणी महिला आणि मुलींना जीव गमवावा लागला. त्याच वेळी, उत्तराखंडची रहिवासी 19 वर्षीय अंकिता भंडारी देखील… या सर्व महिलांच्या समर्थनार्थ मी माझे केस कापत आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘जगभरातील महिला एकजूट होऊन इराण सरकारचा निषेध करत आहेत. केस हे स्त्रियांच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. सार्वजनिक ठिकाणी केस कापून स्त्रिया समाजातील सौंदर्याच्या मानकांची पर्वा करत नसल्याचे दाखवत आहेत. महिलेने कसे कपडे घालावे, तिने कसे वागावे आणि कसे जगावे हे ती इतर कोणालाही ठरवू देऊ शकत नाही. जेव्हा स्त्रिया एकत्र येतात आणि एका स्त्रीचा प्रश्न हा संपूर्ण स्त्री जातीचा प्रश्न मानतात तेव्हा स्त्रीवादात एक नवीन जोम येतो.’ (हेही वाचा: अभिनेत्री एलनाझ नोरोझी हिचा हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा; सोशल मीडियावर पोस्ट केले अर्धनग्न फोटो, व्हिडिओ)

यापूर्वी बॉलीवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी, जी मूळची इराणची आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर 'माय बॉडी-माय चॉइस' नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, याआधी नोएडाच्या सेक्टर 15A मध्ये राहणार्‍या डॉक्टर अनुपमा भारद्वाज यांनी आपले केस कापून या आंदोलनाला पाठींबा दर्शवला होता. त्यांनी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये डॉक्टर अनुपमा भारद्वाज केस कापताना दिसत आहेत.