अमृता फडणवीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा जशी राजकीय वर्तुळात रंगत असते, तशीच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची चर्चा संगीत क्षेत्रात होत असते. अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका आहेत हे आपण याआधी अनेकवेळा पाहिले आहे. आताही याचा नव्याने प्रत्यय देणारे त्यांचे एक गाणे प्रदर्शित होणार आहे. गाण्याचे बोल आहेत ‘तेरी बन जाऊंगी’ (Teri Ban Jaungi). 5 ऑगस्टला हे गाणे प्रदर्शित होणार असून आज या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. गुलशन कुमार यांच्या टी सिरीजच्या (TSeries) अंतर्गत या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याद्वारे आता पुन्हा एकदा चाहत्यांना अमृता यांच्या आवाजाची पर्वणी ऐकायला मिळणार आहे. आतापर्यंत या टीजरला 2 लाख 17 हजार पेक्षा जास्त वेळा पहिले गेले आहे, यावरूनच याच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही लावू शकता. नेहमीप्रमाणेच या गाण्यातही अमृता फडणवीस यांचा यांचा ग्लॅमरस अंदाज या गाण्याला चार चांद लावत आहे. (हेही वाचा: Video : ‘मस्तानी हो गई' गाण्यावर अमृता फडणवीस यांचा नृत्याविष्कार)

दरम्यान याआधीही टी सिरीजने अमृता यांच्या काही गाण्यांची निर्मिती केली होती. टी सिरीजच्या MixTape Season 2 मध्ये अमृता फडणवीस आणि बी. प्राक (B Praak) यांना गाण्याची संधी देण्यात आली होती. तर दोन वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेले ‘फिर से’ गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला अमृता फडणवीस यांनी आपला आवाज दिला होता.