Gulabo Sitabo Trailer: अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांची जबरदस्त जुगलबंदी असलेला 'गुलाबो सिताबो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Gulabo Sitabo Trailer (Photo Credit: Prime Video)

दिग्दर्शक शूजित सरकार (Shoojit Sircar) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एकत्र दिसणार आहे. या जबरदस्त स्टारकास्टमुळे तसेच बिग बींचा या चित्रपटातील लूक मुळे या चित्रपटाची सर्व जण आतुरतेने वाट पाहात होते. मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित केला जाणार आहे.  या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बिग बी आणि आयुष्मान खुराना यांची जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

हा ट्रेलर पाहून लक्षात येईल की यात अमिताभ हा हवेलीचा घरमालक आहे आणि आयुष्मान खुराना हा भाडोत्री. अमिताभ त्याला घरी खाली करायला सांगत आहे. मात्र तो ही हटत नाही. यामुळे या दोघांमध्ये जबरदस्त तूतू-मैंमैं दाखविली आहे. ती पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

पाहा 'गुलाबो सिताबो ट्रेलर':

हेदेखील वाचा- अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराना यांच्या 'गुलाबो सिताबो' सिनेमावरही लॉकडाऊनचा परिणाम; Amazon Prime वरुन 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रत्येक घरमालकाचे आपल्या घराशी थोडी आपुलकी असते. तशीच काहीशी अमिताभ बच्चन यांची आहे. या दरम्यान बिग बी आणि आयुष्मान मध्ये काय काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या चित्रपटातील अमिताभ बच्चन मोठी दाढी आणि मोठ्या चष्म्यासह एक वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. या त्यांच्या हटके लूक मुळे त्यांची या चित्रपटात नेमकी काय भूमिका असेल याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 24 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाऊन मुळे हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राईमवरुन 12 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.