Yash, Ranveer Singh, Allu Arjun look at SIIMA Awards (PC - Instagram)

SIIMA Awards 2022: 10वा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (SIIMA) सोहळा शनिवारी पार पडला. बंगळुरू येथे होणारा हा अवॉर्ड शो दोन दिवस चालणार आहे. जिथे तेलुगु, कन्नड, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांसाठी पुरस्कार दिले जातील. सीमाच्या पहिल्या अवॉर्ड नाईटला अल्लू अर्जुन (Allu Arjun) पासून KGF च्या यश (Yash) पर्यंत जवळपास सर्वच बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. बॉलीवूडचा युवा अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) यालाही या साऊथ अवॉर्डमध्ये विशेष पदवीने सन्मानित करण्यात आले.

बंगळुरूमध्ये पोहोचलेल्या रणवीर सिंगला दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदी अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेत्याने पांढरा टक्सिडो सूट आणि हलक्या निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. (हेही वाचा - Mahabharat Web Series: Disney+ Hotstar ने केली महाभारतावरील वेब सीरिजची घोषणा; पहा फस्ट लूकचे खास फोटोज)

 

View this post on Instagram

 

A post shared by SIIMA (@siimawards)

अल्लू अर्जुनने पुष्पा: द राइजसाठी जिंकला पुरस्कार -

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन सीमामध्ये दंग झाला होता. यंदाच्या कार्यक्रमात 'पुष्पा' चित्रपटासाठी त्याला अनेक नामांकने आणि पुरस्कार मिळाले. त्याला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (तेलुगु) पुरस्कारही मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by SIIMA (@siimawards)

KGF च्या रॉकी भाईने केली शानदार एन्ट्री -

कन्नड इंडस्ट्रीचा रॉकिंग स्टार यश हा देखील या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण होते. त्याने पत्नी राधिका पंडितसह सीमा येथे हजेरी लावली. पांढर्‍या पोशाखात यशने रॉकी भाई स्टाईलमध्ये ग्रँड एन्ट्री केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by SIIMA (@siimawards)

पूजा हेगडे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -

सीमा 2022 मध्ये पूजा हेगडे ही संध्याकाळची सर्वात तेजस्वी स्टार होती. मोस्ट एलिजिबल बॅचलरमधील कामासाठी पूजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. एवढेच नाही तर तिला यूथ आयकॉन साऊथ (महिला) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by SIIMA (@siimawards)

 

View this post on Instagram

 

A post shared by SIIMA (@siimawards)

विजय देवरकोंडालाही मिळाला पुरस्कार -

पूजा हेगडेनंतर विजय देवरकोंडा यालाही या श्रेणीत पुरस्कार मिळाला. विजयने यूथ आयकॉन साऊथ (पुरुष) पुरस्कार जिंकला.