आलिया भट्ट चा Gangubai Kathiawadi सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित; प्रभासच्या राधे श्याम सिनेमाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर
Alia Bhatt in Gangubai Kathiawadi (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस लॉकडाऊन नंतर आता पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. यात सिनेमा क्षेत्रही मागे नाही. शूटिंग पूर्ण झालेले सिनेमे आता सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांसह अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे यंदा प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातच आलिया भट्ट (Alia Bhatt) च्या नव्या  गंगूबाई काठियावाड़ी (Gangubai Kathiawadi) सिनेमाचा रिलीज डेट समोर आली आहे. याची माहिती खुद्द आलिया भट्ट हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना दिली आहे.

आलिया भट्ट ने सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत हा सिनेमा 30 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. या पोस्टरमध्ये आलियाचा वेगळाच थाट दिसत आहे. बॉस लेडीप्रमाणे बसलेली आलिया वेणी आणि ठसठसीत कुंकूवात सुरेख दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर आलियाच्या या सिनेमाची टक्कर थेट प्रभासच्या राधे श्याम सिनेमाशी होणार आहे. (Gangubai Kathiawadi First Look: गँगस्टरच्या रुपातील अभिनेत्री आलिया भट्ट हिचा 'गंगूबाई काठियावाड़ी' मधील फर्स्ट लूक प्रदर्शित)

आलिया भट्ट पोस्ट:

गंगूबाई काठियावाड़ी सिनेमा गेल्या वर्षी 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना संकटामुळे अनेक सिनेमांप्रमाणे या सिनेमाच्या रिलीज डेटमध्येही बदल करण्यात आला. दरम्यान, आलियाच्या या सिनेमाची कथा हुसैन जैदी यांचे पुस्तक माफिया क्वीन ऑफ़ मुंबई वर आधारीत आहे. यात गंगूबाई काठियावाड़ी यांची कहाणी सांगण्यात आली आहे.