आलिया भट्ट सुरु करत आहे स्वतःचे यू ट्यूब चॅनेल; 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर सेक्सी डान्स करत दिली माहिती (Video)
आलिया भट्ट (संग्रहित-संपादित प्रतिमा)

आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या आपला अपकमिंग चित्रपट 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) ची तयारी आहे. चित्रपटाच्या शूटिंगसह अलिया भट्ट सोशल मीडियावर देखील सक्रिय आहेत. नेहमीच आपली पर्सनल आणि सोशल लाईफ सोशल मिडीयावर शेअर करणाऱ्या आलियाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा चित्रपट 'मोहरा' मधील जबरदस्त गाणे 'टिप-टिप बरसा पाणी' वर नृत्य करताना दिसत आहे. पिवळ्या साडी मधील आलिया अतिशय मस्ती करत नृत्य करत आहे, तर तिचे मित्र तिच्यावर पाण्याचा वर्षाव करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट स्वतःचे एक यू-ट्यूब चॅनेल सुरु करत आहे. या चॅनेलद्वारे आलिया तिच्या आयुष्यातील गोष्टी, शूटिंगदरम्यानचे किस्से, फिटनेस फंडे अशा अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. या चॅनेलची माहिती आलिया भट्ट ने स्वत: च्या ट्विटर पोस्टद्वारे दिली आहे. चॅनलचा व्हिडिओ ट्विटरवर लाँच करताना आलियाने लिहिले आहे, 'काही नवीन, काही मजेशीर आणि काही यू-ट्यूब वर.'

आता जो व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे, त्यामध्ये तीचे फक्त नृत्यच नाही तर आपल्या मित्रांसोबत तिने केलेली मस्तीदेखील समाविष्ट आहे. दरम्यान, सध्या आलिया भट्ट बॉलिवूडमधील आघाडीच्या नायीकांपैकी एक समजली जात आहे. सध्या ती तिच्या आगामी ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत काम करत आहे. याशिवाय ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’चे शूटिंगही सुरू करणार आहे.