Alia Bhatt (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा आज 27 वा वाढदिवस (Birthday) असून तिने हा खास क्षण आपल्या फ्रेंड्ससोबत सेलिब्रेट केला आहे. रात्री उशिरा बहिण शाहीन आणि खास फ्रेंड्ससह केक कापून तिने आपल्या बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, आलिया आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईच्या बाहेर गेली असून तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती आपल्या फ्रेंड्ससह केक कापताना दिसत आहे. यंदा बर्थडे निमित्त आलियाने एक नाही तर दोन केक कापले. आलियाची ही धमाल मस्ती व्हिडिओत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओत आलिया व्हाईट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. (Alia Bhatt Birthday Special: आलिया भट्ट हिच्या बर्थडे निमित्त तिच्या बालपणीचे काही Cute Photos)

सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र आलियाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये व्हिडिओमध्ये रणबीर कपूर कुठे दिसत नाही.

पहा आलिया भट्ट हिचा बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओ:

लवकरच आलिया रणबीर कपूर सोबत 'ब्रम्ह्यास्त्र,' संजय दत्त सह 'सड़क 2,' या सिनेमात झळकणार आहे. त्यासोबतच करण जोहरच्या 'तख्त,' भन्साली यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' आणि एस एस रजा मौली यांच्या 'RRR' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामुळे आलियाचे हे वर्ष धमाकेदार असेल, यात वाद नाही. मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे 'ब्रम्ह्यास्त्र' सिनेमाचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे.