आलिया-रणबीर कपूर यांच्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियात व्हायरल? जाणून घ्या त्यामागील सत्य
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Photo Credits: Twitter

बॉलिवूड कलाकार आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोघे रिलेशनशिप मध्ये असून त्यांच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. मात्र आता या दोघांच्या लग्नाचे कार्ड सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. या वेडिंग कार्डवर लग्नाची तारीख 22 जानेवारी 2020 असे लिहिले आहे. परंतु या गोष्टीवर आलिया भट्ट हिने स्पष्टीकरण दिले आहे.नुकताच आलिया हिला विमानतळावर पाहिले असता त्यावेळी तिला लग्नाच्या तारखेबाबत विचारले. त्यावेळी 22 जानेवारीच्या तारखेवरुन जोरजोरात हसू लागली. आलियाने यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. मात्र सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे वेडिंग कार्ड खोटे असल्याचे बोलले जात आहे.

वेडिंग कार्डवर रणबीर आणि आलिया यांचे नाव लिहिले आहे. कार्डावर आलिया हिच्या वडिलांचे नाव सुद्धा चुकीचे लिहिले आहे. आलिया हिच्या वडिलांचे नाव महेश भट्ट आहे त्याऐवजी कार्डवर मुकेश भट्ट असे लिहिले आहे. चुकीची नावे लिहिल्यामुळे व्हायरल झालेले वेडिंग कार्ड फेक असल्याचे कळते.(हर्षल गिब्स ने शेअर केले आलिया भट्ट चे मीम, लिहिले ही मुलगी कोण आहे माहित नाही, लोकांनी घेतली मजा)

आलिया आणि रणबीर यांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास दोघे बॉलिवूडमधील आगामी सिनेमा 'ब्रम्हात्र' यांच्यामध्ये झळकणार आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन एक महत्वाची भुमिका पार पाडणार आहे. चित्रपटाचा लोगो लॉन्च करण्यात आला आहे. तसेच 'कलंक' चित्रपटातून आलिया भट्ट वरुण धवन यांच्यासोबत मुख्य भुमिकेत दिसली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला होता. दुसऱ्या बाजूला रणवीर 'संजू' चित्रपटातून झळकला होता. बॉक्स ऑफिसवर काही रेकॉर्डसुद्धा तोडले  होते.