Sooryavanshi and 83 to release on OTT?: कोरोना व्हायरसमुळे देशात अद्याप सिनेमागृह सुरू झालेले नाहीत. मात्र, नियमांचे पालन करून सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. कोरोना संकटामुळे अनेक निर्माते आपले चित्रपट OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करत आहेत. अशातचं अक्षय कुमार (Akshay Kumar) चा सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपट आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) चा 83 चित्रपट OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे.
बॉलीवुड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, आता रिलायंस एंटरटेनमेंटन आपले दोन्ही चित्रपट डिजिटल प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची तयारी करत आहे. मात्र, रिलायन्स एंटरटेनमेंटचे सीईओ शिबासिश सरकार यांची हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याची इच्छा आहे. कोरोना संकटामुळे या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख आणखी पुढे ढकलण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - गणेश चतुर्थी निमित्त करीना कपूर खान चा मुलगा तैमुर ने आपल्या खेळण्यांमधून साकारला 'हा' सुंदर गणपती बाप्पा, फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल)
दिवाळी किंवा ख्रिसमपर्यंत सिनेमागृह सुरू झाल्यास हे दोन्ही चित्रपट चित्रपटगृहातचं प्रदर्शित केले जातील. परंतु, कोरोना संकटामुळे सरकारने सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी दिली नाही, तर चित्रपट प्रदर्शनासाठी दुसरा पर्याय निवडण्यात येईल, असंही शिबासिश सरकार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सूर्यवंशी या चित्रपटात अक्षयकुमारची भूमिका आहे. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंगच्यादेखील भूमिका असणार आहेत. तसेट 83 हा चित्रपट भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित आहे. यात रणवीर सिंगची मुख्य भूमिका असून त्याच्यासोबत दिपिका पडुकोण, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.