Twinkle Khanna साठी Akshay Kumar ची रोमँटिक पोस्ट; म्हणाला, 'अजूनही तुला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे'
Akshay Kumar, Twinkle Khanna (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारची Twinkle Khanna साठी रोमँटिक पोस्ट

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांच्यासाठी 17 जानेवारीची तारीख खूप खास आहे. 17 जानेवारीला ट्विंकल आणि अक्षय कुमार एकमेकांचे लाईफ पार्टनर बनले. अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला 21 वर्षे झाली आहेत आणि या खास प्रसंगी अभिनेत्याने एक मोहक फोटो शेअर केला. अक्षयने त्याच्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी अक्षयने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे बघत आहेत, फोटोमध्ये दोघांमधील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. फोटोसोबत अक्षयने रोमँटिक कॅप्शनही लिहिले आहे, चाहत्यांना फोटोसोबतचं कॅप्शनही खूप आवडलं आहे. (वाचा - Allu Arjun: 'पुष्पा'च्या यशानंतर अल्लू अर्जुनचा 'हा' चित्रपट होणार हिंदी भाषेत प्रदर्शित)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने पोस्टला दिले रोमँटिक कॅप्शन -

फोटो शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आमच्या लग्नाला 21 वर्षे झाली आहेत, पण तरीही मी तुला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा प्रत्येक दिवस पूर्वीसारखा बनवल्याबद्दल अनेक धन्यवाद. टिना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...' याशिवाय अक्षयने कॅप्शनमध्ये हार्ट आणि किसचे इमोजी देखील वापरले आहेत. त्याच वेळी, अक्षयने #21YearsOfAdventure असं लिहिलं आहे.

अक्षय कुमारचे आगामी प्रोजेक्ट्स

बॉलिवूडचा खिलाडी कुमार एका वर्षात चाहत्यांना एकापेक्षा जास्त चित्रपटांची भेट देतो. एकीकडे अक्षयचे सिनेमे रिलीज होत असतात, तर दुसरीकडे तो बॅक टू बॅक शूटींगही करत असतो. अक्षयच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, गोरखा, ओएमजी 2, सेल्फी, रक्षा बंधन, मिशन सिंड्रेला, बच्चन पांडे, पृथ्वीराज आणि राम सेतू यांचा या यादीत समावेश आहे.