मुंबई महानगरपालिका संबंधित ट्वीट करुन अक्षय कुमार फसला, नेटकऱ्यांनी सोशल मीडियात केले ट्रोल
अक्षय कुमार (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याने मुंबई महानगरपालिका Mumbai BMC) संबंधित एक ट्वीट केले आहे. मात्र त्याने केलेल्या ट्वीटवरुन त्याची सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे. यापूर्वीसुद्धा अक्षय कुमारला त्याच्या नागरिकत्वावरुन ट्रोल करण्यात आले होते.

अक्षयने त्याने ट्वीटच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेने एक ट्वीटर अकाउंट बनवले आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोणत्याही समस्या किंवा सल्ले द्यायचे असल्यास या अकाउंटवर आपले मत व्यक्त करा असे आवाहन केले आहे. परंतु अक्षयने केलेल्या या ट्वीटमुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

 

(हेही वाचा-अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी; कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय तांत्रिक बाब - 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेचं अक्षय कुमार चं समर्थन)

तर काही नेटकऱ्यांनी कॅनडाचे नागरिकत्व असलेल्यांनी मुंबईकरांना अक्कल शिकवू नये असे म्हटले आहे. मात्र अक्षयने त्याच्या नागरिकत्वाबद्दल वारंवार स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे. त्याचसोबत भारतात राहून मी टॅक्ससुद्धा भरतो असे ही म्हटले होते.