Bell Bottom चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; पाहा खिलाडी अक्षय कुमारचा हटके अंदाजातील 'Action' व्हिडिओ
Akshay Kumar (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरस (Coronavirus)आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) लांबणीवर गेलेल्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बेल बॉटम' (Bell Bottom) या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सह तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगसाठी या चित्रपटातील अन्य कलाकार आपल्या कुटूंबासह लंडनला गेली आहेत. शूटिंगला सुरुवात करण्याच्या निमित्ताने अक्षय कुमार याने लाइट्स, कॅमेरा म्हणत हटक्या अंदाजात शूटिंगचा श्रीगणेशा केला आहे. अशा स्वरूपातील एक व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सामाजिकतेचे भान ठेवून लाइट्स, कॅमेरा, मास्क ऑन असे म्हणत अॅक्शन क्लॅपर बोर्ड वर टॅप केले आहे.बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबत 'बेलबॉटम' चित्रपटात झळकणार वाणी कपूर; अभिनेत्रीने सोशल मिडियावरुन व्यक्त केला आनंद

पाहा व्हिडिओ:

बेल बॉटम हा चित्रपट रंजित तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. अक्षय कुमारसह लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी, प्रोड्यूसर जैकी भगनानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. कोरोना व्हायरस महामारी मध्ये हा पहिला भारतीय चित्रपट असेल जो विदेशात जाऊन शूट करेल. याचे चित्रिकरण युनायटेड किंग्डमला होणार आहे.

या चित्रपटाच्या कलाकारांविषयी बोलायचे झाले तर, निर्माता जॅकी भगनानी ने सांगितले की , कथेच्या मागणी नव्याने जोडली गेली. प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या फिल्मला प्रोड्यूस करणारे जॅकीने सांगितले की, "वाणी एक बुद्धिमान आणि प्रभावी अभिनेत्री आहे आणि तिचे आजतागायत केलेले काम फार आवडले आहे." बेलबॉटम हा चित्रपट 2 एप्रिल 2021 ला प्रदर्शित होईल.