Into The Wild With Bear Grylls: खिलाडी अक्षय कुमार आणि बेयर ग्रिल्स च्या शोचा नवा प्रोमो आला समोर; पाहा साहसी प्रवासाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ
Akshay Kumar And Bear Grylls (Photo Credits: Instagram)

Discovery+ वरील जगप्रसिद्ध कार्यक्रम 'Into The Wild With Bear Grylls' मध्ये आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) याने सहभाग घेतला होता. त्यात आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील लवकरच या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे समजताच चाहत्यांमध्ये या शो ची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अलीकडेच अक्षय कुमार याने ट्विटरवर याबाबत माहिती देत याचा एक प्रोमो शेअर केला होता. आता या शो चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अक्षय कुमार आणि बेयर ग्रिल्स यांची साहसी दृश्ये अंगाचा थरकाप उडवून देणारी आहेत.

हा कार्यक्रम येत्या 11 सप्टेंबरला आणि त्यानंतर 14 सप्टेंबरला डिस्कवरी चॅनेलवर पाहता येईल.

हेदेखील वाचा- Into The Wild With Bear Grylls: अक्षय कुमार चा बेयर ग्रिल्स सोबतच्या एपिसोडचा धमाकेदार प्रोमो; Discovery+ वर 11 सप्टेंबरला होणार प्रिमियर

स्टंट आणि अॅक्शन सीन्सच्या बाबतीत हातखंडा असलेला अक्षय कुमार जेव्हा रियल लाईफमध्ये बेयर ग्रिल्स सोबत स्टंट करेल तेव्हा ते चित्र कसे असेल याबाबत अनेकांना लागून राहिली आहे.

अक्षय कुमार हा बेयर ग्रिल्स सोबत शो करणारा पहिला बॉलिवूड कलाकार ठरला आहे. दरम्यान आता क्रिकेटर विराट कोहली देखील आगामी एपिसोड्समध्ये दिसू शकतो अशी चर्चा आहे.