अक्षय कुमारने भारतीय पासपोर्टसाठी अखेर केला अर्ज, परंतु 'या' गोष्टीचं त्याला अजूनही वाटतं वाईट
Akshay kumar (Photo Credit - File Photo)

अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. त्याने आजवर आपल्या करिअरमध्ये हॉलिडे, बेबी, रुस्तम, मिशन मंगल या सारख्या अनेक देशभक्तीवर चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो आपल्या चित्रपटांबद्दल बर्‍याचदा चर्चेत असतोच पण काही काळापूर्वी अक्षय कुमारकडे कॅनेडियन नागरिकत्व असल्याची टीका झाली होती. सोशल मीडियावर या विषयाची चर्चा होत असून लोक अनेकदा त्यांच्याविषयी बोलतात.

हिंदुस्तान टाईम्सच्या एका इव्हेंटला करीना कपूर सोबत आला होता. या कार्यक्रमात त्याने या वादावर उघडपणे भाष्य केले. अक्षयला या कार्यक्रमादरम्यान विचारले होते की जेव्हा तो देशभक्ती आणि भारतीय सशस्त्र सैन्याबद्दल बोलतात तेव्हा बरेच लोक त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट नाही किंवा मतदान करत नाहीत असे म्हणत त्यांना टार्गेट करतात, परंतु त्याला याबद्दल काय वाटते?

अक्षय कुमारने भारतीय पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज केल्याचे उघडकीस आले आहे. तो म्हणाला, "मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. मी एक भारतीय आहे आणि मला एका गोष्टीचं दुःख वाटतं की मी भारतीय असल्याचे मला नेहमी सिद्ध करण्यास सांगितले जाते. माझी पत्नी, माझी मुलं सर्व भारतीय आहेत. मी येथे कर भरतो आणि इथेच माझं संपूर्ण जग आहे."

Sexiest Asian Male 2019: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन ठरला आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष!

अक्षयने त्याला प्रत्यक्षात कॅनेडियन नागरिकत्व कसे मिळाले हे देखील सांगितले. तो म्हणाला की त्याच्या पदार्पणात आलेले 14 चित्रपट फ्लॉप झाले होते आणि त्यांना वाटले की त्यांचे करिअर संपले आहे. त्याच्या एका मित्राने त्याला त्याच्याबरोबर काम करण्यासाठी कॅनडा येथे येण्यास सांगितले. यानंतरच अक्षयने कॅनेडियन पासपोर्ट मिळविण्यासाठी अर्ज केला. तथापि, त्याचा 15 वा चित्रपट चांगला झाला आणि त्यानंतर अक्षयने मागे वळून पाहिले नाही.