Bachchan Pandey चित्रपटातून प्रथमच एकत्र दिसणार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी ही जोडी, जानेवारी 2021 मध्ये शूटिंगला होणार सुरुवात
Akshay Kumar And Arshad Warsi (Photo Credits: Twitter)

साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) निर्मित 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटातील अक्षय कुमार (Akshay Kumar) चा लूक काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. मात्र आता चित्रपट समीक्षक तरण आदर्श (Taran Adarsh) याने या चित्रपटाबाबत आणखी एक महत्त्वाची बातमी सांगितली आहे. या चित्रपटात प्रथमच अक्षय कुमार आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) ही जोडी एकत्र दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटात धमाल कॉमेडी असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. या चित्रपटात अभिनेत्री किर्ती सेनॉन (Kriti Sanon) देखील दिसणार असून अजून एका अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे. मात्र ही अभिनेत्री कोण याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2021 मध्ये सुरु होणार असून जैसलमेरमध्ये होणार आहे. हे शूटिंग मार्च 2021 पर्यंत सुरु राहील. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.हेदेखील वाचा- Bachchan Pandey Poster: अक्षय कुमारच्या इंटेन्स लूक मध्ये 'बच्चन पांडे'चं पहिलं पोस्टर; ख्रिस्मस 2020 मध्ये सिनेमा होणार रीलिज

बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमार एका गँगस्टरची भूमिका करणार आहे. तर किर्ती सेनॉन ही एका महिला पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. तसेच अर्शद वारसी हा अक्षयच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट असल्यामुळे अक्षय आणि अर्शद यात काय धमाल करतात याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.