Bachchan Pandey Poster: अक्षय कुमारच्या इंटेन्स लूक मध्ये 'बच्चन पांडे'चं पहिलं पोस्टर; ख्रिस्मस 2020 मध्ये सिनेमा होणार रीलिज
Bachchan Pandey First Look (Photo Credits: Twitter)

Bachchan Pandey First Look :  बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आज (26 जुलै) त्याचा आगामी सिनेमा 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey)या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. साजिद नाडियाडवाला याच्या आगामी बच्चन पांडे या सिनेमामध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचा खास लूक आज शेअर करण्यात आलेल्या पाहिल्या पोस्टरमधून प्रदर्शित करण्यात आला आहे. नाडियाडवाला ग्रैंडसनने या सिनेमाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

अक्षय कुमारच्या लूकसह शेअर केलेल्या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरच्या खाली 'ख्रिस्मस 2020 अजूनच मजेशीर होणार' असं कॅप्शन लिहलं आहे. साजिद नाडियाडवालाची पुढची फिल्म ही अक्षय कुमारसोबत असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजी (Farhad Samji) यांनी केलं आहे.

अक्षय कुमारच्या सिनेमाची पहिली झलक

अक्षय कुमारच्या गळ्यात सोन्याची चैन, हातात नॉन चॅक आणि लुंगी परिधान केलेला एक इंटेन्स लूक पोस्टरमध्ये पहायला मिळत आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा देखील अ‍ॅक्शनपॅक्ट असणार आहे. टशन सिनेमामध्येही अक्षयच्या भूमिकेचं नाव बच्चन पांडे होतं. अक्षय कुमारचा 'मिशन मंगळ' हा सिनेमा 12ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये भारताच्या मंगळस्वारीचा इतिहास उलगडण्यात आला आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार सोबत विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. त्यानंतर सूर्यवंशी, हाऊसफुल्ल 4 लक्ष्मी बम या सिनेमातही अक्षय कुमार झळकणार आहे.