Aishwarya Rai चे कॅन्सर पीडित मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन; 'या' लोकप्रिय गाण्यावर ठरला ठेका  (Video)
ऐश्वर्या राय-बच्चनचे कॅन्सर पीडित मुलांसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन (Photo Credits: Instagram)

ख्रिसमस (Christmas) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याची धूम सर्वत्र जगभरात असता आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही कसे मागे राहतील. बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनने (Aishwarya Rai Bachchan) टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली आणि तेथील मुलांसोबत ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले. कॅन्सर पीडित मुलांच्या आयुष्यात त्यानिमित्ताने आनंद आणण्याचा ऐश्वर्याचा हा प्रयत्न होता.

या सेलिब्रेशनमध्ये ऐश्वर्याने 'बंटी और बबली' सिनेमातील 'कजरारे' या लोकप्रिय गाण्यावर मुलांसोबत डान्सही केला.

पाहा त्या क्षणांचे काही फोटोज आणि व्हिडिओज...

 

 

ऐश्वर्या राय लवकरच "गुलाबजामून" या सिनेमात झळकेल. या सिनेमातून ऐश्वर्या-अभिषेक ही जोडी 10 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरकार राज सिनेमात दोघांना एकत्र पाहायला मिळाले होते.