Aishwarya Rai Bachchan Birthday Special: 90 च्या दशकातील ऐश्वर्याच्या चाहत्यांना या लोकप्रिय जाहिराती Nostalgic नक्की करतील!
Aishwarya Rai Bachchan (Photo credits: Youtube)

Aishwarya Rai Bachchan 46th Birthday: ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूड क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. घरात सिने क्षेत्राशी कुणाचाही संबंध नव्हता. पण 1994 साली ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड ठरली आणि तिचं आयुष्यचं बदललं. निळ्या डोळ्याच्या या सौंदर्यवतीने सार्‍यांनाच भूरळ पाडली. मिस वर्ल्ड ऐश्वर्याने मनी रत्नम यांचा 'इरुवार' या तमिळ सिनेमामधून सिनेक्षेत्रात पाऊल ठेवलं तर ' और प्यार हो गया' या हिंदी सिनेमातून ऐश्वर्या बॉलिवूड मध्ये आली. अभिनेत्री म्हणून काम करताना ऐश्वर्या जाहिरातींमध्येही झळकत होती. त्यामुळे 90 च्या शतकातील तिच्या फॅन्सवर सिनेमांप्रमाणे तिच्या जाहिरातींच्या आठवणीदेखील तितक्याच खास आहेत. मग तुम्ही देखील 90's चे आहात? मग ऐश्वर्याच्या या जुन्या जाहिराती पाहून जुन्या आठवणींमध्ये काही काळ नक्की रमून जाल. ऐश्वर्याने टायटन, कोको कोला, लॅक्मे सोबत काही खास अ‍ॅड शूट केलं होतं.

Titan Ad-

Pepsi ad-

The Lakme Ad-

Coca-cola Ad

 दूरदर्शनची नेत्रदान जाहिरात 

बॉलिवूड नंतर ऐश्वर्याने काही हॉलिवूडचे सिनेमे देखील केले. त्यामुळे तिचे जगभरात फॅन्स अअहेत. बच्चन घराण्याची सून आणि आई झाल्यानंतर ऐश्वर्याने सिने क्षेत्रात चोखंदळ काम केले आहे. आता ऐशवर्या मोजक्याच सिनेमांमधून रसिकांसमोर येते. यंदा ऐशवर्याचा 46 वा वाढदिवस आहे. बर्थ डे सेलिब्रेशनसाठी ऐश्वर्या पती अभिषेक अअणि लेक आराध्यासोबत इटलीमध्ये आहे.