पुलवामा (Pulwama) मध्ये 14 फेब्रुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) पाकिस्तानला (Pakistan) प्रतिउत्तर देत त्यांच्या पाकिस्तानव्याप्त काश्मिर येथे घुसुन दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यामुळे आता चित्रपट निर्मात्यांना या हल्ल्यावर कथा लिहिण्याचे वेध लागले आहेत. तर संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी पुलवामा हल्ल्याच्या कथेवर चित्रपट बनवणार असल्याचे ठरविले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेत कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दिग्दर्शकाने केदारनाथ सारखा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिला होता. तसेच महावीर जैन हा चित्रपट प्रोड्युस करणार आहेत. या चित्रपटासंबंधित तयारी सुरु करण्यात आली असून या वर्षाच्या अखेरपूर्वी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तर 26 फेब्रुवारी रोजी बालकोट मधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघचनेच्या तळावर हल्ला केला होता. ज्यामध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. हा चित्रपट वायुसेनेने केलेल्या कारवाईला सलामी देण्यासाठी बनवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.