Mahesh Manjrekar Saaho Look: प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'साहो' हा सिनेमा 30 ऑगस्ट दिवशी रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज (10 ऑगस्ट) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या सिनेमामध्ये खास भूमिकेत झळकणार्या महेश मांजरेकरांचा (Mahesh Manjrekar) लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. महेश मांजरेकरांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून 'साहो' (Saaho) सिनेमातील त्यांचा लूक शेअर केला आहे.
Demons Do Have Shadow असं पोस्टर लिहण्यात आलं आहे. त्यामुळे महेश मांजरेकर 'साहो' सिनेमात खलनायकी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकर सध्या बिग बॉस मराठी 2 या शोचं सूत्रसंचलन करत आहेत. 'विकेंडचा डाव' मध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांची शाळा घेणार्या मांजरेकरांना आता या नव्या रूपात बॉलिवूडमध्ये पहाणं त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेची गोष्ट आहे. Saaho New Poster: 'साहो'च्या नव्या पोस्टरवर श्रद्धा कपूर-प्रभास यांचा अॅक्शन अवतार (Photo)
महेश मांजरेकर यांचे ट्वीट
#Saaho pic.twitter.com/ldUEpPJF2O
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) August 10, 2019
बाहुबली सिनेमातून जगभर पोहचलेला प्रभास साऊथमध्ये अत्यंत लोकप्रिय असून त्याची लोकप्रियता बॉलिवूड स्टार्सला टक्कर देण्याइतकी नक्कीच आहे. याशिवाय प्रभास-श्रद्धा ही नवीकोरी जोडी, त्यांची केमिस्ट्री, रोमान्स आणि अॅक्शन पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. 'साहो' सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या शिवाय नील नितीन मुकेश, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ आणि मंदिरा बेदी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.