Tiger 3 च्या रिलीजनंतर चाहत्यांनी थिएटरबाहेर वाजवला ढोल-ताशा, Watch Viral Video
TIGER 3 Massive Celebrations at GALAXY (PC - Twitter)

Tiger 3: सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3) रिलीज झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहते चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची वाट पाहत होते. दिवाळीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'टायगर 3'चा पहिला शो सकाळी 6 वाजता सुरू झाला. सलमानच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये इतकी क्रेझ होती की सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर लोकांची गर्दी होती. इतकंच नाही तर चाहत्यांनीही चित्रपटाच्या रिलीजचा आनंद साजरा केला.

यशराज स्पाय युनिव्हर्सचा चित्रपट 'टायगर 3' मध्ये सलमान आणि कतरिना यांच्या मुख्य भूमिका आहेत. अविनाश सिंग राठोड (सलमान खान) आणि झोया (कतरिना कैफ) यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. (हेही वाचा -Kareena Kapoor Khan-Saif Ali Khan's Diwali Party: रणबीर कपूर-आलिया भट्ट, सारा अली खान, इब्राहिम अली खान, नीतू कपूरसह अनेक सेलिब्रिटी पोहचले करिना कपूरच्या पार्टीला)

या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचवेळी थिएटरबाहेर सलमानचे चाहते ढोल-ताशांच्या तालावर जोरदार ठेका धरताना दिसले. इतकेच नाही तर चाहते थिएटरबाहेर 'भाईजान'चा जल्लोष करतानाही दिसले.

चित्रपटगृहाबाहेर 'टायगर 3' चे सेलिब्रेशन -

चाहत्यांनी 'टायगर 3' रिलीज एखाद्या सणासारखा साजरा केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, तुम्हाला सलमानचे अनेक चाहते त्यांच्या गळ्यात स्कार्फ बांधून जल्लोष करताना दिसत आहेत. या चित्रपटात सलमान अशाचं स्टाईलमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर लोकांनी टायगर 3 च्या पोस्टरला पुष्पहार घालून आनंद साजरा केला.

अनेक चाहत्यांनी 'टायगर 3' ला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटले आहे. यात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे कॅमिओ देखील आहेत. सलमान खानची एन्ट्री पाहून चित्रपटगृहात एकच जल्लोष करण्यात आला. या चित्रपटात इमरान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली आहे.