Aditya Narayan Wedding: बॉलिवूड गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आपली मैत्रीण अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत (Shweta Agarwal) लग्नगाठ बांधणार आहे. आदित्यने स्वत: एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतील आदित्यने सांगितले की, 'मी आता 10 वर्षांच्या नात्याला विवाह बंधनात बांधण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी माझे नाते कधी लपवले नाही. पण एकेकाळी त्याच्याविषयी बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर मी याबद्दल बोलणे बंद केले. आमची ओळख शापित या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ लागलो,' असंही आदित्यने सांगितलं.
आदित्यने यासंदर्भात पुढे बोलताना सांगितले की, प्रत्येक नात्याप्रमाणेच आम्ही अनेक चढ- उतार पाहिले आहेत. लग्न ही आता केवळ एक औपचारिकता आहे. या वर्षाच्या अखेरीस आम्ही लग्नबंधनात अडकणार आहोत. माझ्या आई-वडिलांनाही श्वेता खूप आवडते. श्वेताच्या स्वरुपात मला माझा आत्ममित्र मिळाला. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. (हेही वाचा - Thalaivi: कंगना रनौत चा आगामी चित्रपट थलाइवी च्या सेटवरील जयललिताचा लूक सोशल मीडियावर व्हायरल)
आदित्यच्या म्हणण्यानुसार, माध्यमांमध्ये त्याच्या आणि श्वेता यांच्या नात्याविषयी बर्याच गोष्टी घडल्या. प्रत्येक नात्यात अडचणी असतात. परंतु, कोणताही मार्ग थांबत नाही. आम्ही तो चांगला पद्धतीने पार केला. आदित्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आदित्य नारायण अभिनय आणि गाण्याव्यतिरिक्त रिअॅलिटी शोचे आयोजन करीत आहेत. लोकांनाही त्यांची शैली प्रचंड आवडते.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात गायक उदित नारायण यांनी संगीत क्षेत्रातील डिजिटल युगात पदार्पण केलं होतं. यासाठी त्यांना आदित्यने मोठी मदत केली होती. त्यामुळे उदित नारायण यांनी आदित्यचे आभार मानत लोक नेपोटिझमवर बोलतात मात्र, मला माझ्या मुलाने डिजिटल युगात लाँच केलं, अशी भावना व्यक्त केली होती.