तमिळ अभिनेत्री Razia Wilson ला फेस सर्जरी करणं पडलं महागात; सुंदर चेहऱ्याचे झाले नुकसान; पहा फोटो
रझिया विल्सन (Photo Credits: Instagram)

Tamil Actress Razia Wilson Face Surgery Goes Wrong: सेलिब्रिटींनी त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि आपलं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली दिसण्यासाठी अनेकदा कॉस्मेटिक सर्जरीचा पर्याय निवडतात. परंतु, प्रत्येक वेळी त्यांना यात यश मिळेल, याची शाश्वती नाही. कॉस्मेटिक शस्त्रक्रियेमुळे या सेलिब्रिटींना बर्‍याच वेळा पश्चात्ताप सहन करावा लागला आहे. अलीकडे तमिळ अभिनेत्री रझिया विल्सनसोबतही (Razia Wilson) असचं काहीसं घडलं आहे.

रझियाने इन्स्टाग्रामवर सांगितले की, तिला फेस सर्जरी करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, असे असूनही डर्मेटोलॉजिस्टने तिला फेस सर्जरी करण्यास सांगितले आणि तिच्या चेहर्‍यावर शस्त्रक्रिया केली. सोशल मीडियावर, अभिनेत्रीने तिच्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रझियाच्या डाव्याजवळ सूज दिसत आहे. तसेच तिच्या त्वचेचा रंगही बदलला आहे. (वाचा - Rakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार)

रझिया विल्सन ची इंस्टाग्राम स्टोरी (Photo Credits: Instagram)

अभिनेत्रीने सांगितलं आहे की, शस्त्रक्रिया झाल्यापासून ती डॉक्टरांशी संपर्क साधायचा प्रयत्न करत आहे. पण ती डॉक्टराशी बोलू शकली नाही. डॉक्टरच्या कर्मचार्‍यांनी ते शहराबाहेर गेले असल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत रझियाने सोशल मीडियावर एक संदेश पोस्ट केला आहे. त्यानंतर चाहते यावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raiza Wilson (@raizawilson)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raiza Wilson (@raizawilson)

दरम्यान, असे बरेचं लोक आहेत ज्यांना डॉक्टरचा अशा प्रकारचा वाईट अनुभव आला आहे. रझियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने धनुष आणि काजोल यांच्याबरोबर 'Velaiyilla Pattathari 2' मधून करिअरची सुरूवात केली. 'बिग बॉस तमिळ' या टीव्ही कार्यक्रमात स्पर्धक म्हणून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.