पायल रोहतगी व सलमान खान (Photo Credit Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगी (Payal Rohatgi) अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पायल ट्विटरवर देखील आपली मते, मुद्दे ठामपणे मांडत आली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार पायल रोहतगीचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड (Twitter Account Suspend) करण्यात आले आहे. पायलने स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार हे खाते बंद करण्यापूर्वी तिला कोणतीही माहिती किंवा पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. असे अचानक ट्विटर अकाऊंट बंद केल्याबद्दल पायलने नाराजी व्यक्त केली आहे. यासह सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने चाहत्यांना तिचे ट्विटर अकाऊंट पुन्हा मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

Why my Twitter Account is SUSPENDED ?????

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi) on

पायल रोहतगीने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. तिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, ‘अर्धा तासापूर्वी मला कळले की माझे ट्विटर खाते निलंबित केले गेले आहे. कोणतेही कारण न सांगता, मला फोन किंवा मेलद्वारे न कळविता ही कारवाई झाली आहे. मी कोणालाही शिवी देत नाही, कोणाबद्दल अपशब्द वापरत नाही. मी फक्त ज्या खऱ्या गोष्टी आहेत, जी तथ्ये आहेत ती मांडण्याचा प्रयत्न करते. मात्र माझ्या या प्रयत्नांना चुकीच्या प्रकारे दर्शविले जात आहे.’

त्यानंतर पायलने अजून एक व्हिडिओ शेअर करत यामागे सलमान खानचा हात असल्याचा आरोप केला आहे. सलमान  खानच्या लोकांनी तक्रार केल्याने हे घडल्याचे पायल म्हणते. (हेही  वाचा: सलमान खान ने त्याचा आगामी चित्रपट 'राधे' चे शूटिंग पूर्ण करण्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय; ऑगस्ट मध्ये पूर्ण होणार शूटिंग)

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi) on

पुढे पायलने आपल्या चाह्त्यांच्याकडे एक विनंती केली आहे. ती म्हणते, ‘माझे ट्विटर अकाऊंट का सस्पेंड झाले हे तुम्ही चाहत्यांनी शोधून काढा. तसेच ते परत मिळवण्यासाठी मागणी करा नाहीतर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.’ पायलने ट्विटर मेसेजचा एक स्क्रीनशॉटही शेअर केला ज्यात तिचे हँडल सस्पेंड झाल्याचे लिहिले आहे. पायलचे ट्विटर अकाउंट बंद केल्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वी जूनमध्ये पायलचे ट्विटर अकाउंट सस्पेंड झाले होते.