Zomato Delivery Boy Case and Pariniti Chopra (Photo Credits: Facebook)

सोशल मिडियावर सध्या व्हायरल झालेल्या Zomato डिलिवरी बॉय प्रकरण सध्या प्रचंड गाजतय. मेकअप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएंसर हितेशा चंद्रानी (Hitesha Chandrani) ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झोमॅटो बॉयने (Zomato Delivery Boy Case) आपल्याला मारहाण केल्याचे सांगितले होते. मात्र त्या डिलिवरी बॉयच्या म्हणण्यानुसार त्याने असे काहीच केले नव्हते. मात्र तिच्या तक्रारीमुळे त्याचा जॉब गेला. त्यामुळे त्याला न्याय देण्यासाठी सोशल मिडियावर अनेकजण सपोर्ट करत आहे. यात आता बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोपड़ा (Pariniti Chopra) हिने देखील या डिलिव्हरी बॉयच्या बाजूने उभी राहत त्याला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे ट्विट केले आहे.

डिलिवरी बॉय कामराजने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की, सर्वात आधी त्या महिलेने मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि मला चप्पलने मारले. त्या दरम्यान हितेशाला तिच्या हातातील अंगठीमुळे तिच्या नाकाला दुखापत झाली. या सर्वावर परिणिती चोपड़ाने ट्विट करत 'या प्रकरणातील सत्य समोर आणले जावे' असे सांगितले आहे.हेदेखील वाचा- मुंबईत दागिने पॉलिशिंग करुन देण्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक

परिणिती चोपड़ाने ट्विटरवर झोमेटो इंडियाला टॅग करुन असे लिहिले आहे की, 'झोमेटो इंडिया, प्लीज सत्य समोर आणा आणि सत्य सांगा. जर ही व्यक्ती गुन्हेगार नाही तर त्या महिलेचे सत्य समोर आणा आणि तिला शिक्षा होण्यासाठी मदत करा. हे खूपच लज्जास्पद आहे. मला सांगा की मी कशा प्रकारे तुमची मदत करुन शकेन ते.' असे ट्विट परिणितीने केले आहे.

डिलिवरी बॉय कामराज याच्या म्हणण्यानुसार, ट्रॅफिकमुळे हितेशाला डिलिवरी उशिरा पोहोचली. त्याबद्दल त्याने तिची माफी देखील मागितली. ती त्याला डिलिवरीचे पैसे देईल या अपेक्षेत तो होता. मात्र तिने त्याच्याशी भांडायला सुरुवात केली.