Nilu Kohli Husband Dies: अभिनेत्री नीलू कोहलीचे पती हरमिंदर सिंगचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह
Nilu Kohli, Harminder Singh (PC - Instagram)

Nilu Kohli Husband Dies: मनोरंजन विश्वातून पुन्हा एकदा एक वाईट बातमी समोर येत आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहलीचे (Nilu Kohli) पती हरमिंदर सिंग कोहली (Harminder Singh Kohli) यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. हरमिंदर सिंग यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. हरमिंदर सिंग यांचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला.

अभिनेत्री नीलू कोहलीचा पती हरमिंदर सिंग कोहली पूर्णपणे निरोगी होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर गेल्या शुक्रवारी त्यांनी गुरुद्वारालाही भेट दिली होती. तेथून परतल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले आणि बराच वेळ बाहेर आले नाही. यानंतर घरात उपस्थित असलेल्या मदतनीसाने त्याचा शोध घेतला असता ते बाथरूममध्ये पडलेले आढळून आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हरमिंदर सिंग यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (हेही वाचा - Naatu Naatu Oscar: माझ्यामुळे नाटू नाटूला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचे अजय देवगणचे कपिल शर्मा शोमध्ये वक्तव्य)

वृत्तानुसार, नीलूची जिवलग मैत्रीण वंदना अरोरा हिने अभिनेत्रीच्या पतीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. वंदनाने सांगितले की, यावेळी मदतनीस घरात उपस्थित होता आणि तो हरमिंदर सिंग कोहलीसाठी दुपारचे जेवण बनवत होता. तो त्यांना दुपारचे जेवण देण्यासाठी हरमिंदर बाथरूममधून परत येण्याची वाट पाहत होता. बराच वेळ होऊनही हरमिंदर बाथरूममधून बाहेर न आल्याने हेल्परने बेडरूममध्ये जाऊन तपासणी केली असता, हरमिंदर तिथेच पडलेला होता. वंदनाने असेही सांगितले की, हरमिंदर हे मधुमेहाचे रुग्ण होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नीलू कोहलीने छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा पराक्रम दाखवला आहे. 1999 मध्ये आलेल्या 'दिल क्या करे'मध्ये त्या सहाय्यक भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांनी 'निम्मो ते विम्मो' या पंजाबी मालिकेतही काम केले होते. त्यांनी 'जय हनुमान' या हिंदी मालिकेतही काम केलेय 2022 मध्ये पिरियड ड्रामा चित्रपट 'जोगी'मध्येही त्या दिसल्या होत्या. याशिवाय त्यांनी 'हिंदी मीडियम', 'हाऊसफुल 2', 'रन' सारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.