Ankita Lokhande Father Death: अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे निधन; अभिनेत्रीने मुलाचे कर्तव्य पाडले पार, वडिलांना दिला खांदा
nkita Lokhande gives Kandha to her late Father (PC - Instagram)

Ankita Lokhande Father Death: टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) वर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच या अभिनेत्रीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवलं आहे. अंकिताचे वडिल शशिकांत लोखंडे (Shashikant Lokhande) यांचे शनिवारी निधन झाले. आज अभिनेत्रीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. अंकिता लोखंडे हिच्या वडिलांच्या पार्थिवावर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेली अंकिता लोखंडे वेदनेने आईचा धीर बांधताना दिसली. वडिलांच्या निधनाने अंकिता आणि तिच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांच्या अत्यंयात्रेदरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये अंकिता तिचा पती विकी जैनसोबत दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे रडताना दिसत आहे. या दुःखाच्या काळात, अंकिताला तिचा पती विकी जैन आधार देताना दिसत आहे. तो तिचे सांत्वन करताना दिसत आहे. अंकिता लोखंडेने वडिलांच्या अंत्यसंस्कारात मुलाचे कर्तव्य पार पाडले आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांना खांदा दिला आहे. (हेही वाचा -राष्ट्रीय हिंदू परिषदाची 'OMG 2' बाबत घोषणा, Akshay Kumar ला कानशिलात मारणाऱ्याला देणार 10 लाख रुपये)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अंकिता लोखंडेच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला अनेक टेलिव्हिजन स्टार्स उपस्थित होते. श्रद्धा आर्यसह अनेक स्टार्सनी अभिनेत्रीच्या वडिलांना निरोप दिला. अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन कसे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 12 ऑगस्ट रोजी सकाळी अंकिताच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काही काळापूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.