
Actress Angel Rai Gets Death Threat: 'घोटाळा' वेब सीरिजमधील अभिनेत्री एंजेल राय (Angel Rai) हिला सोशल मीडिया फॉलोअर्सकडून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 'घोटाळा' या वेब सिरीजच्या ट्रेलर लाँचनंतर या धमक्या वाढल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने तिला जिवंत जाळण्याची आणि इजा करण्याची धमकी दिल्याचा आरोप अभिनेजत्रीने केला आहे.
मुंबईच्या बांगूर नगर भागात राहणाऱ्या राय हिने सांगितले की, तिला बऱ्याच काळापासून अशा धमक्या मिळत आहेत आणि आता तिने कायदेशीर मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा -Apoorva Mukhija Creates Ruckus at Concert: अपूर्वा मुखिजाने Sabrina Carpenter च्या पॅरिस कॉन्सर्टमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप; सोशल मिडीयावर होत आहे टीका (Video))
View this post on Instagram
राय यांच्या वक्तव्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राय यांनी तिच्या तक्रारीत नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून तिला एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे ईमेल येत आहेत, जो तिला अश्लील संदेश देखील पाठवत आहे.