बंगाली अभिनेता आणि दिग्दर्शक चौमित्र चटर्जी यांचे निधन (Actor Soumitra Chatterjee Passes Away) झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. 6 ऑक्टोबर 2020 या दिवशी त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर Belle Vue रुग्णालयात प्रदीर्घ काळापासून उपचार सुरु होते. चौमित्र चटर्जी ( Soumitra Chatterjee) यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. परंतू, प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालतात दाखल करण्यात आले. काही काळ त्यांना कृत्रीम जीवन प्रणालीवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर रविवारी (15 नोव्हेंबर 2020) दुपारी 12.15 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चटर्जी यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांनी चटर्जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
सौमित्र चटर्जी यांच्यावर न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, कार्डियोलॉजी, क्रिटिकल केयर मेडिसिन तज्ज्ञांचे एक पथक गेल्या 40 दिवसांपासून लक्ष ठेऊन होते. त्यांनी चटर्जी यांची प्रकृती ठिक करण्याचा निकराने प्रयत्न केला. परंतू, चटर्जी यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही.
सौमीत्र चटर्जी हे सातत्याने कार्यकरत होते. या वर्षी (2020) त्यांचे 7 चित्रपट प्रदर्शीत झाले होते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाशी लढाई यशस्वीपणे जिंकल्यानंतर त्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचेही शुटींग पूर्ण केले होते. (हेही वाचा, Kamala Thoke Passes Away: लागिरं झालं जी फेम 'जिजी', अभिनेत्री कमला ठोके यांचे कर्करोगाने निधन)
बंगाली चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण, आघाडीचे आणि दमदार दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. सन 1989 मध्ये आलेल्या 'अपुर संसार' चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. सौमित्र यांनी ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत 14 चित्रपटांमध्ये काम केले होते. सौमित्र चटर्जी यांचा दमदार अभिनय आणि रंगमंचावरील समयसुचकता त्यांना उत्कृष्ट अभिनेता बनवून गेला.
सौमित्र हे पहिले भारतीय अभिनेते होते, ज्यांना फ्रास सरकारच्या वतीने देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार Ordre des Arts et des Lettres देऊन सन्मानित करण्यात आले होते. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित सौमित्र चटर्जी यांना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्यांना संगीत नाटक अॅकेडमी अवॉर्ड, 7 फिल्मफेअर आणि पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
International, Indian and Bengali cinema have lost a legend today. It is a sad day for Bengal today. He will be cremated with full honours and a gun-salute: West Bengal CM Mamata Banerjee https://t.co/8ri6jN4TW4 pic.twitter.com/bQIuO4vYVt
— ANI (@ANI) November 15, 2020
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सौमित्र चटर्जी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय, भारतीय आणि बंगाली चित्रपटांनी आज एक आख्यायिका गमावली. आजचा दिवस बंगालसाठी दु: खाचा दिवस आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.