
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या चर्चेत आहे. कारण तिचा नवरा राज कुंद्रा याच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यानंतर शिल्पा शेट्टी हिचा सुद्धा जबाब मुंबईच्या गुन्हे शाखेने नोंदवून घेतला आहे. अभिनेत्री काही दिवस सोशल मीडियात अॅक्टिव्ह नव्हती. मात्र पुन्हा एकदा आपल्या कामाकडे परतल्यानंतर ती वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांना प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत होती. कोणत्याही भीतीशिवाय शिल्पा हिने कॅमेऱ्या समोर येण्यास आता सुरुवात केली आहे.
शिल्पा शेट्टी हिने नुकतीच एक पोस्ट केली होती. यामध्ये शिल्पा हिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर करत त्यावर 17 सप्टेंबर अशी तारीख लिहिली होती. या पोस्टमध्ये शिल्पाने शेअर केले की, काही चुकीचे निर्णय घेतले. मात्र भुतकाळापासून आता पुढे जायचे आहे. माझ्या चुका मला पुन्हा करायचा नाही आहेत. त्यामधून शिकवण घेत पुढे जायचे आहे. आजूबाजूच्या लोकांसोबत मला सहजतेने वागायचे आहे.(मुंबई: अभिनेता Manoj Patil याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अभिनेता Sahil Khan सह अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल)
पुढे शिल्पा शेट्टी हिने लिहिले की, कोणीलाही जुन्या गोष्टीमध्ये परतता येत नाही आणि नवी सुरुवात करता येऊ शकत नाही. प्रत्येकजण आतापासून सुरुवात करु शकतो आणि अंत एक शानदार पद्धतीने करु शकतो. या नोटसह शिल्पा शेट्टीने एक लाल रंगाचा मोठा हार्टचा इमोजी सुद्धा पोस्ट केला आहे.

शिल्पा शेट्टी सध्या वाईट काळातून जात आहे. शिल्पाचा नवरा राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणी जेलमध्ये आहे. अशातच शिल्पा शेट्टीवर काही आरोप लावले जात आहेत. त्यावर ही काही अफवा सुद्धा उडत आहेत. आता शिल्पाने आता सर्व गोष्टींसह आपल्या ट्रोलिंग संदर्भात विधान जाहीर केले आहे. यावर तिने म्हटले की, अद्याप ही शांत आहे आणि पुढे ही शांत राहणार आहे.