Actor Payal Ghosh joins Union Minister Ramdas Athawale-led Republican Party of India (A) | Photo Credits: Twitter

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि आरपीआय  (Republican Party of India) अध्यक्ष रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीमध्ये आज (26 ऑक्टोबर) अभिनेत्री पायल घोष (Actor Payal Ghosh) हीचा पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. दरम्यान तिच्याकडे आता आरपीआय महिला आघाडीचं उपाध्यक्ष पद (vice president of women's wing of RPI) देण्यात आलं आहे. मुंबई मध्ये आरपीआय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आहे.

पायल घोष ही मूळची कोलकत्ता येथील आहे. तेथेच तिचं शिक्षण झालं आहे. दरम्यान ती आता अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबई मध्ये आली आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये काम करते. कोलकत्ता येथील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पायल घोष Political Science Honours म्हणून पदवीधर आहे.

ANI Tweet

सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवणारी पायल घोष 2012 साली विवेक अग्निहोत्रीच्या 'फ्रीडम' सिनेमामध्ये झळकली होती. 2017 साली वीर दास सोबत पटेल की पंजाबी शादी या सिनेमामध्येही तिने काम केले आहे. तर 'साथ निभाना साथिया' या मालिकेतही राधिकेच्या पात्रात पायल रसिकांसमोर आली होती. सध्या अभिनयासोबतच राजकारणातही ती आपलं नशीब आजमवत आहे.