Actress Juhi Chawla (PC - Instagram)

कोरोना व्हायरसमुळे 2020 मध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. परंतु काही लोकांनी लॉकडाऊनचा फायदा सुद्धा घेतल्याचे दिसून आले. तसेच कामकाज बंद असण्यासह लोकांचा रस्त्यावर ही आवाज कमी होऊ लागला होता. त्यामुळे पर्यावरणात सकारात्मक बदल दिसून आले होते. परंतु परिस्थिती जशी सामान्य रुपात येऊ लागली त्यानुसार पर्यावरणात पुन्हा प्रदुषणाचा स्तर वाढत चालला आहे. याच दरम्यान आता बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला हिने आज याबद्दल चिंता व्यक्त करत ट्विट ही केले आहे.

जूही हिने ट्वीट करत असे लिहिले आहे की, मुंबईतील हवेला काय झाले आहे? मी माझ्या बालकनीत चालत होती त्यावेळी मला असे वाटले माझ्या श्वासात धुळ जातेय. असे होऊ शकते लॉकडाऊन मध्ये ऐवढी वाईट परिस्थिती नव्हती. कारण तेव्हा हवेची गुणवत्ता किती सुधारणा झाली होती.(शिल्पा शिरोडकर ठरली कोविड-19 लस घेणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री; शेअर केला Photo)

Tweet:

तर लॉकडाऊन दरम्यान, पर्यावरणात खुप बदल दिसून आला होता. यामध्ये पशूपक्षी असो किंवा वातावरण यामध्ये अनुकूल बदल झाल्याचे दिसून आले होते. जूही चावला हिच्या या ट्विटवर लोकांनी प्रतिक्रिया देत आपल्या पद्धतीने याचे कारण सांगितले आहे. एका युजर्सने कमेंट करत असे म्हटले की, मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याचे बहुतांश लोक हे रस्त्याने प्रवास करत आहेत. त्याच कारणामुळे प्रदुषण वाढत आहे. तर दुसऱ्याने मेट्रो रेलच्या कामामुळे प्रदुषण होत असल्याचे म्हटले आहे.