शिल्पा शिरोडकर ठरली कोविड-19 लस घेणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री; शेअर केला Photo
Shilpa shirodkar (Photo Credit: Instagram)

वर्षभरापासून संपूर्ण जग कोविड-19 (Covid-19) संकटाचा सामना करत आहे. आता मात्र या लढाईत आपण एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहचलो आहोत. कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्ध लस मिळाली असून काही देशांत लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. भारतात देखील लवकरच लसीकरण मोहिम सुरु होईल. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) हिने कोरोना लस घेतली आहे. याची माहिती खुद्द शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. शिल्पाने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला आहे. त्यात तिने डाव्या दंडावर लस घेतल्याचे दिसत आहे.

हा फोटो शेअर करत शिल्पाने लिहिले की, "लस घेतल्याने सुरक्षित वाटत आहे. द न्यू नॉर्मल... 2021 मी तयार आहे. धन्यवाद UAE." एका मीडिया रिपोर्टनुसार, UAE मधील 8 टक्के लोकांनी कोरोना लस घेतली आहे.

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shirodkar (@shilpashirodkar73)

शिल्पा शिरोडकर अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहिण आहे. साऊथचा सुपरस्टार महेश बाबू तिचे जिजाई आहेत. दरम्यान, शिल्पाने 'किशन कन्हैया', 'त्रिनेत्र', 'हम', 'दिल ही तो है', 'आँखें', 'पहचान', 'गोपी किशन', 'मृत्युदंड' यांसारख्या सिनेमात काम केले आहे. 'गज गामिनी' या सिनेमातून ती शेवटची प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

दरम्यान, आज  भारतात 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 736 जिल्ह्यांमध्ये कोविड-19 लसीची ड्राय रन होणार आहे. यात मुंबईचा देखील समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 2 जानेवारी रोजी लसीची ड्राय रन पार पडली होती. आता लवकरच लसीकरणालाही सुरुवात होईल, अशी आशा आहे.