बॉलिवूडचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ विनोदी कलाकार जगदीप जाफरी (Jagdeep Jafri) यांचे 8 जुलै ला मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडसह त्यांचे चाहतेही हळहळले. नआपल्या अभिनयातून नेहमीच सर्वांना हसवणारे जगदीप जाफरी अखेर जाता जाता सर्वांना रडवून गेले. आपल्या वडिलांच्या निधनाने अभिनेता जावेद जाफरी (Javed Jafri) याचे दु:ख ही तितकेच मोठे आहे. त्यामुळे जावेदने वडिलांच्या निधनानंतर ट्विटरच्या माध्यमातून एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांसोबतच्या आठवणींना उजााळा दिला आहे.
या पोस्टमध्ये जावेदने सर्व लोकांचे आभार मानले ज्यांनी त्याच्या वडिलांना मदत केली होती. तसेच त्यांच्या चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमानेही जावेद भारावून गेला आणि त्या सर्वांचेही त्याने आभार मानले. Veteran Actor Jagdeep Sahab Passed Away: शोले चित्रपटात 'सूरमा भोपाली' व्यक्तिरेखा साकरणारे जेष्ठ अभिनेते जगदीप साहब यांचे निधन
"माझ्या वडिलांच्या निधनाचे दु:ख ज्यांनी पूर्ण प्रेम, आपुलकीसह व्यक्त केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. इतके प्रेम, इतका आदर, इतक्या प्रार्थना...???" हीच माझ्या वडिलांची 70 वर्षांची कमाई.
🙏🏽🙏🏽🙏🏽My heartfelt thanks to all who shared the pain of my fathers departure with (cont) https://t.co/0L1Qr7JkbS
— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) July 12, 2020
"सात वर्षांचे असताना वडिलांना गमावल्यानंतर आणि या वयातच विभाजन झाल्यानंतर सा-या गोष्टींना मुकणे आणि मग मुंबईच्या रस्त्यांवर गरीबांसह गुजराण करणे ही गोष्टी काही साधी नव्हती. एका 8 वर्षाच्या मुलाला आपल्या आईसोबत एका समुद्रात फेकल्यानंतर त्या मुलाला एक पाण्यात डुबता येणार होतं वा पोहता येणार होतं. त्यानंतर छोट्या कारखान्यांत काम करण्यापासून पतंग बनविण्यापर्यंत, साबण विकण्यापर्यंत आणि एक मालिशवाल्यासोबत हातात तेलाचा डब्बा घेऊन 'मालिश तेल मालिश तेल' असे ओरडण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास. वयाच्या 10 व्या वर्षी सिनेमाने सिनेमातून त्यांना या अंधा-या दुनियेतून प्रकाशात आणले' असे जावेद जाफरी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
बीआर चोपड़ा यांची 'अफसाना' ही त्यांची पहिली फिल्म. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांना अनेक चांगले लोक भेट गेले. उत्कृष्ट कॉमिक टायमिंग, संवेदनशील व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. आजकाल Legend हा शब्द अगदी सहजपणे बोलला जातो. मात्र माझे वडिल या शब्दाचे खरे मानकरी होते. माझ्या वडिलांनी मला जीवन कसे जगायचे ते शिकवले, गरीबी नेमकी काय गोष्ट आहे ते सांगितले आणि मन लावून काम करण्याचे महत्व सांगितले.
अनेकांचे इरादे पक्के असतात मात्र कधी कधी शरीर साथ देत नाही. ज्यांना मी 'पापा' म्हणून हाक मारायचो आणि जगभरातील लोक वेगवेगळ्या नावाने ओळखायचे, त्या माझ्या वडिलांना सलाम!!! उगाच तुमचे नाव सूरम भोपाली ठेवण्यात आले नव्हते. असेही जावेदने म्हटले आहे.