Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मूसवाला हत्याकांडातील आरोपी शूटर टिनू पंजाब पोलिसांच्या ताब्यातून फरार
Singer Sidhu Moosewala (PC - Instagram)

Sidhu Moose Wala Murder Case: पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालाला (Sidhu Moose Wala) गोळ्या घालणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर टिनू (Tinu) पंजाब पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पंजाब पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा गुंड दीपक टिनू हा मानसाच्या सीआयए कर्मचार्‍यांच्या ताब्यातून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानसा सीआयए स्टाफची टीम त्याला कपूरथला जेलमधून रिमांडवर आणत होती. यावेळी पोलिसांच्या पथकाला चकमा देऊन तो पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Raksha Bandhan OTT Release Date: अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' तारखेला होणार रिलीज)

मुसेवाला हत्येबाबत त्यांची लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. 27 मे रोजी कॉन्फरन्स कॉलवरून दोघांनी बोलले आणि 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली. मूसवाला यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये दीपक टिनूचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.