Aashram Chapter 2 Trailer: 'आश्रम चॅप्टर 2' चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओल सोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री
Aashram Chapter 2 Trailer (Photo Credits: YouTube)

बॉलिवूडमध्ये आपले वडिल धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओल इतके सुपरहिट ठरण्यात अयशस्वी ठरलेल्या अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) ने यावर्षी मात्र हिट्सचा सपाटा लावला आहे. अलीकडेच आलेले आश्रम चॅप्टर 1 (Aashram Chapter 1) आणि क्लास ऑफ 83 जबरदस्त हिट ठरले आहेत. OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांमुळे बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं असच म्हणावं लागेल. त्यातचा आता आश्रमचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर 2' (Aashram Chapter 2) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, विश्वासघात या सर्वांचे दर्शन घडवणारा हा ट्रेलर पाहून लोकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मराठी प्रेक्षकांसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात बॉबी देओल सह मराठी अभिनेत्री झळकणार आहे.

या अभिनेत्रीचे नाव आहे अदिती पोहनकर. ही अभिनेत्री रितेश देशमुख याच्यासह 'लय भारी' या चित्रपटात दिसली होती. आश्रम चॅप्टर 2 चित्रपटाचा ट्रेलर पाहून अदिती आणि बॉबी देओल यांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळत आहे. हेदेखील वाचा- Aashram Ban: नेटीझन्सनी सोशल मीडियावर केली प्रकाश झा यांच्या 'आश्रम' वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी; जाणून घ्या काय आहे यामागचं कारण

पाहा ट्रेलर

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. यात बॉबी देओलसह चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयनका, अध्ययन सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, तुषार पांडे, सचिन श्रॉफ, अनुरीत्ता के झा, राजीव सिद्दीकी, राजेश सिंघल भी हैं. तन्मय रंजन, प्रीति सूद, जहाँगीर खान, कनुप्रिया गुप्ता आणि नवदीप तोपर प्रमुख भूमिकेत दिसतील.

हा क्राईम ड्रामा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल असे एकूण ट्रेलरवरुन दिसत आहे. येत्या 11 नोव्हेंबरला हा चित्रपट MX Player वर प्रदर्शित होईल.