Aamir Khan चा भाचा Imran Khan याचा अभिनय क्षेत्राला रामराम!
Imran Khan & Aamir Khan (Photo Credits: Instagram)

Imran Khan Quits Acting Career: बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) याचा भाजा इमरान खान (Imran Khan) याने अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला आहे. इमरान खानचा जवळचा मित्र अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) याने फेसबुक लाईव्ह माध्यमातून याबाबत माहिती दिली. कंगना रनौत च्या 2015 मध्ये आलेल्या 'कट्टी बट्टी' सिनेमात तो शेवटचा झळकला होता. 2008 मध्ये आलेल्या 'जाने तू या जाने ना' सिनेमातील इमरान च्या अभिनयाचे भरभरुन कौतुक झाले होते.

इमरान चा मित्र अक्षय ओबेरॉय याने नवभारत टाईम्सशी बोलताना सांगितले की, "माझा प्रिय मित्र इमरान खान आता अभिनेता राहिलेला नाही. त्याने सिनेसृष्टीला जवळपास सोडून दिली आहे. इमरान माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी अजूनही त्याला पहाटे 4 वाजता कॉल करतो. आम्ही 18 वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही दोघांनीही अंधेरीच्या किशोर एक्टिंग स्कूल मधून शिक्षण घेतले आहे."

 

View this post on Instagram

 

A post shared by Imran Khan (@imrankhan)

अभिनयातून काढता पाय घेतल्यानंतर सिनेमा दिग्दर्शनात इमरान पाऊल ठेवणार का? असे विचारले असता अक्षय म्हणाला की, "जेवढे मी जाणतो त्यावरुन इमरान मध्ये एक लेखक दडला आहे. मला नाही माहित तो सिनेमाचे दिग्दर्शन कधी करेल आणि मी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव देखील टाकणार नाही. मात्र एका मित्राच्या नात्याने एकच सांगेन की तो लवकरच सिनेमाचे दिग्दर्शन करेल."

यापूर्वी इमरान खान पत्नी अवंतिका सोबत घटस्फोट घेत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. मात्र त्या निव्वळ अफवा असल्याचे कालांतराने स्पष्ट झाले. इमरान खान याने 2011 मध्ये  अवंतिका मलिय हिच्याशी विवाह केला. त्यांना इमारा नावाची मुलगी आहे.

दरम्यान, यापूर्वी आमिर खान सोबत 'सीक्रेट सुपरस्टार' आणि 'दंगल' या सिनेमात काम करणारी अभिनेत्री जायरा वसीमने देखील सिनेसृष्टीतून संन्यास घेतला असल्याची बातमी समोर आली होती. आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी तिने असा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले होते.